Skip to content

पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे

ता. धुळे  जि. धुळे
logo1
Menu

आंतरवर्ग प्रशिक्षण

          पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे हे महाराष्ट्र पोलिसांच्या १० प्रशिक्षण केंद्रांपैकी एक प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्तालये व जिल्हा पोलीस दल यामध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल यांना मूलभूत प्रशिक्षण (फाउंडेशन कोर्स) देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना ०९ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. पोलिसांच्या प्रभावी कामकाजासाठी आवश्यक विविध पोलिसिंग कौशल्ये शिकवणे हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


          आंतरवर्ग प्रशिक्षण हे सकाळच्या सत्रात आयोजित केले जाते. त्यांना भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, लघु कायदे, सायबर गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था हाताळणी, एफआयआर नोंदणी, पंचनामा, सायबर फॉरेन्सिक्स, पुराव्याचे संकलन, तपास, गुन्हे प्रतिबंध, पोलिस व जनता संबंध, फॉरेन्सिक सायन्स, संगणक मूलभूत गोष्टी, सीसीटीएनएस (गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम), बोटांचे ठसे इत्यादी विषय शिकवले जातात.

              पोलिसांचा समाजाकडे पारंपारिक पणे पाहण्याचा दृष्टिकोन आजकाल पुरेसा नसल्याने भावनिक प्रज्ञा यांसारखे विविध विषय त्यांना तक्रारदार, कुटुंब आणि संपूर्ण समाजाकडे अधिक दयाळू दृष्टिकोन ठेवण्यास मदत करत आहेत व त्यांना कार्य कुशल बनवीत आहेत.

प्रशिक्षण साहित्याचे अपग्रेडेशन

digital learning

आंतरवर्ग प्रशिक्षक हे अत्याधुनिक फ्लिप टीव्ही चा वापर आणि इतर इलेक्ट्रॉनिक अध्यापन साधनांच्या मदतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देतात. नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या सर्व विषयांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले जाते आणि वेळोवेळी ते अद्यावत केले जाते. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना सर्व नमूद विषय समजून घेणेकामी खूप उपयुक्त ठरते.

notes

सर्व विषयांच्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात अतिशय सुलभ नोट्स तयार केल्या आहेत. या आमच्या प्रशिक्षणार्थींसाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. मागील काही प्रशिक्षण सत्रांपासून आंतरवर्ग प्रशिक्षक हे तीमाही तसेच सहामाही परीक्षांच्या मदतीने प्रशिक्षणार्थींमध्ये झालेल्या सुधारणांचा नियतकालिक आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या प्रगतीचे हळूहळू विश्लेषण करण्यासाठी हे नमूद विविध उपक्रम खूप उपयुक्त ठरले आहेत.